पूंछमध्ये दहशतवाद्यांवर छापे   

जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधात रविवारी मोहीम उघडली आहे. त्याअंतर्गत विविध ठिकाणी छापे घातले. सीमावर्ती क्षेत्रातील दहशतवादी जाळे नष्ट करण्याचा प्रमुख हेतू त्या मागे आहे, असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.
 
१२ हून अधिक ठिकाणी पोलिसांनी छापे घातले आहेत. ज्या ठिकाणी दहशतवाद्यांचे भूमिगत हस्तक लपले असावेत, असा संशय असलेल्या घरांवर ते टाकले आहेत.  व्याप्त काश्मीरमधून अनेक दहशतवादी हस्तक पूंछ परिसरातील त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आश्रय घेऊन लपले असावेत, अशी शक्यता गृहित धरुन कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरुन अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा संग्रह जप्त केला आहे. कारवाई आणखी काही ठिकाणी सुरू आहे. आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही.

Related Articles